लोकशाहीर कॉम्रेड. आण्णाभाऊ साठे स्मारकासाठ जागा नाही दिल्यास उपोषणाचा इशारा:- भारतीय स्टुडंट्स फेडरेशन,अण्णाभाऊवादी जनआंदोलन
लोकशाहीर कॉम्रेड. आण्णाभाऊ साठे स्मारकासाठ जागा नाही दिल्यास उपोषणाचा इशारा:- भारतीय स्टुडंट्स फेडरेशन,अण्णाभाऊवादी जनआंदोलन मुखेड / प्रतिनिधी : - मुखेड तालुक्यातील मौजे आखरगा येथे मागील २० वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी लोकशाही मार्गाने मागणी केली जात आहे परंतु अध्यापर्यंतय जागा उपलब्ध होऊ शकली नाही.सदरील वर्षे हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या वर्षात कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी गा वात हकाची जागा नाही त्यामुळे अण्णाभाऊवादी समाजावर अन्याय केला जात असल्याचा आरोप भारतीय स्टुडंट्स फेडरेशन व अण्णाभाऊवादी जनआंदोलन यांनी केला आहे .लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या जागेसाठी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी गावातील सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी फक्त आश्वासनाशिवाय काही दिले नाही यावेळेस आम्हांला स्मारकासाठी जागा नाही मिळाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करु अशी बो चरी टीका करत भारतीय स्टुडंट्स फेडरेशन चे मुखेड तालुकाध्यक्ष राहुल गजलवाड यांनी गावप तळीवर सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन दिले . यावेळी , ...