कोरोनाचा अहंकार! सायंकाळी 26 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; बाधित रुग्ण संख्या 484 वर
प्रतिनिधि :- बल्खी आसद
एकाच कुटुंबातील पाच ते सात सदस्यांचा समावेश.
नांदेड दि.06 जुलै: आज सायंकाळी प्राप्त 102 अहवालापैकी, नवे 26 अहवाल पॉझिटिव्ह तर 67 अहवाल निगेटिव्ह आढळेल आहेत. 9 अहवाल अनिर्णीत आले आहेत. आज सायंकाळी पुन्हा 26 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्ण संख्या 484 झाली आहे.
बाधित रुग्णांचा तपशील:-
• विकास नगर, नांदेड- 2 पुरुष वय 72 व 39
• दत्तात्रय नगर, त .मुखेड - 1 पुरुष वय 52
• दत्तात्रय नगर, त .मुखेड - 2 महिला वय 35 व 68
• दापका, ता. मुखेड- 1 पुरुष, वय 10
• पोलीस कॉलनी, ता. मुखेड- 1 पुरुष, वय 30
• उत्तम निवास, नांदेड - 1 महिला, वय 36
• मोहिजा परांडा ता. कंधार - 1 महिला, वय 23
• न्यू हसापूर, नांदेड- 2 पुरुष, वय 47 व 6
• न्यू हसापूर, नांदेड- 2 महिला वय 02 व 50
• उमर कॉलनी, नांदेड - 3 पुरुष प्रत्येकी वय 04, 03 व 61
• बालाजी नगर, तरोडा, नांदेड- 5 पुरुष वय प्रत्येकी 05, 25, 30, 58 व 05
• बालाजी नगर, तरोडा, नांदेड- 2 महिला वय 34 व 55
• पीर बुरहान, नांदेड- 1 महिला वय 18
• देगलूर नाका नांदेड , 1 महिला वय 42
• पळसा हदगाव - 1 महिला वय 25
आज सायंकाळी नवीन 26 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील बाबत संख्याही 484 झाली आहे. सध्या 127 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजारातून बरे झालेले आज 1 रुग्णास सुट्टी देण्यात आली आहे, एकूण 335 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. औषध उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे आतापर्यंत 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Comments
Post a Comment