शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान
शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान
----------------------------------------------------------
विविध क्षेत्रातील 101 जणला केले सन्मानित
----------------------------------------------------------
मुखेड (वार्ताहर)- मागील सात महिन्यापासून जिल्ह्यासह राज्यभरात कोरोना महामारी आजाराने थैमान घातले असून नागरिक भीतीने भयभीत झाले आहेत.जिकडे तिकडे आजाराचा प्रसार वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती.अशा संकट काळात तसूभरही आपल्या कर्तव्यापासून थोडेसे ही विचलित न होता न मागे हटता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या खऱ्या खुऱ्या कोरोनायोद्धाचा यथोचित सन्मान शिवाजी फाऊंडेशन व साप्ताहिक मुखेडचे लोकसंकेतचे संपादक नामदेव यलकटवार यांच्या संकल्पनेतून नुकताच करण्यात आला आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना यावेळी गौरविण्यात आल्याने या उपक्रमाचे तालुका, जिल्हाभरासह भारतातून कौतुक केले जात आहे.कोरोना महामारी वाढत्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजी आणि चिंतेचे वातावरण असतांना नागरिक भयग्रस्त झाले आहेत अनेक नागरिकाची मानसिक अवस्था खलावली गेली असून बहुतांश नागरिक घराबाहेर ही जाणे टाळत असून तणावाखाली वावरत आहेत.अशा या संकटसमयी आपले कर्तव्य चोखपणे बजावत स्वतःच्या जीवाची व कुंटूंबियाची सुद्धा परवा न करता कोरोनायोद्धा म्हणून बाजी लावत या महामारीच्या लढाईत योगदान देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे कौतुक करावे पाठीवर शाब्बासकीची थाप मारावी या उदात्त हेतून शिवाजी फाऊंडेशनचे अध्यक्ष व मुखेडचे लोकसंकेतचे संपादक नामदेव यलकटवार यांनी कोरोनायोद्धाचा दि 09 रोजी शाल हार सन्मानपत्र देऊन सन्मान केले आहेत.
गणाचार्य मठसंस्थानचे प्रमुख डॉ.विरूपाक्ष शिवाचर्य महाराज, भाजपाचे जेष्ट नेते माधव अण्णा साठे ,श्री वीरभद्र स्वामी महाराज,नाजीम पाशा,शिवाजी कार्लेकर, वैजनाथ दमकोडवार, गजानन कोंडामंगले यांच्यासह काही मान्यवरांच्या हस्ते कोरोनायोद्धांना गौरविण्यात आले व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या वेळी तहसीलदार काशिनाथ पाटील, पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर, डॉ दिलीप पुंडे, डॉ.अशोक कौरवार,डॉ रामराव श्रीरामे,डॉ प्रकाश पांचाळ,डॉ रणजित काळे, डॉ.महेश पत्तेवार, गटविकास अधिकारी सि.एल.रामोड,सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे,फौजदार गजानन काळे,फौजदार अनिता इटबोने, गणपती चित्ते,मुख्याधिकारी विजय चव्हाण,वृत्तपत्र विक्रेते अनंत संगेवार,मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अॅड संदीप कामशेट्टे व अॅड सुनील पौळकर,जेष्ट साहित्यिक एकनाथ डुमने,मराठीचे अभ्यासक शिवाजी आंबुलगेकर,
प्रा.डाॅ.बळवंत पाटील,प्रा.डाॅ.असर्जन टाले, श्रीकांत थगणरे,अरविंद थगनरे,सचिन रामदिनवार,हेमंत मिसलवाड यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी,सामाजिक कार्यकर्त्या अनेक जणांचा यात समावेश आहे.
श्नी.नामदेव यलकटवार यांच्या उपक्रमाचा सर्व स्तरावर कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment