नांदेड: आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, तब्बल 83 रुग्ण वाढले; 2 जणांचा बळी नवे रुग्ण: मुखेडमध्ये तब्बल 29 रूग्ण बाधित

 नांदेड: आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, तब्बल 83 रुग्ण वाढले; 2 जणांचा बळी नवे रुग्ण: मुखेडमध्ये तब्बल 29 रूग्ण बाधित।
                                                                                                                                                     प्रतिनिधि:- बल्खी आसद।                                                                                                                             नांदेड:- आज दिनांक २५/०७/२०२० रोजी प्राप्त झालेल्या एकूण ४४५ अहवालापैकी ३२७ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले , तसेच आज रोजी एकूण ८३ अहवाल पॉझीटीव्ह आढळले आहेत . त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १२५२ एवढी झाली
 सध्या 513 पॉझिटिव रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यातील 10 रुग्णांची यामध्ये 4 महिला रुग्ण आणि 6 पुरुष रुग्ण यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे. प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळपर्यंत प्राप्त होतील. एकूण पॉझिटिव्ह 1252 रुग्णांपैकी 672 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या केवळ 513 रुग्णांवर औषध उपचार सुरू आहेत.
 
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.