शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.
शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा
मुखेड/प्रतिनिधी :- बल्खी आसद
खरीप हंगामाचे पेरणीचे दिवस जवळ येत आहेत परंतु शेतकरी कर्ज माफी योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना सीएससी केंद्रात जाऊन आधार व्हेरिफिकेशन करणे आवश्यक होते. त्या नंतरच नवीन कर्ज वाटप प्रक्रिया सुरू सुरू होईल असे बँका कडून सांगण्यात येत होते या मुळे शेतकऱ्यांची बँका आणि सीएससी केंद्रावर पायपीट करावी लागत होती.शासनाने कर्जमाफी योजनेची साईट बंद केल्या मुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. हीच बाब विचारात घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाशिष कामेवार व मुखेड तालुक्याचे शहर चिटणीस भाई आसद बल्खी यांनी दि.16 रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे सीएससी केंद्रावर कर्जमाफी योजनेची साईट सुरू करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या मागणी ची तात्काळ दाखल घेत दि.17 रोजी सिएससी केंद्रावरील कर्जमाफी योजनेची साईट सुरू केली आहे. त्या मुळे शेकाप चा मागणी नंतर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Post a Comment