जिल्हाधिकाऱ्यांच्या ब्रेक द चेन मोहीमेस मुखेड कडकडीत बंद
मुखेड प्रतिनिधि:- बल्खी आसद
मुखेड तालुक्यात कोरोना रुग्णाची दररोज संख्या वाढत असल्याने येथील नागरीक चिंताग्रस्त झाले असून या आजाराची चेन तोडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी ' ब्रेक द चेन ' ही मोहीम सुरु केली आहे . या मोहिमेला प्रतिसाद देत नागरिकांनी तालुका कडकडीत बंद पाळला असून काही नागरीक या आदेशाकडे कानाडोळा करुन बाहेर पडणाऱ्यांवर तहसीलदार , पोलिस , नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली . मुखेड तालुक्यात कोरोना प्रादूर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शहरातील व्यापाऱ्यांची आ.डॉ.तुषार राठोड यांनी बैठक घेवून ११ जुलै रोजी पासूनच शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता . त्यातच जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटणकर यांनी जिल्ह्यात कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून करोना आजाराची चेन तोडण्यासाठी १२ जुलै रोजीच्या मध्यरात्रीपासून ते २० जुलैपर्यंत ' ब्रेक द चेन ' ही मोहिम सुरु केली आहे . या मोहिमेतील बंदला तालुक्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत तालुका बंद पाळत असून रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे . शहरात जिल्हाधिकारी यांच्या लॉकडाऊन आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली असून यामध्ये दुचाकीसह इतर वाहनांची प्रशासनाकडून कसून चौकशी केली जात आहे . या चौकशीत तहसीलदार काशिनाथ पाटील व मुख्याधिकारी विनोद चव्हाण यांनी रस्त्यावर उतरुन चौकशी करीत आहेत . तर यांच्या पथकात नायब तहसीलदार महेश हांडे , डी.एल. गुंगे , बालाजी बोरसुळे , संदीप भुरे , नगर परिषदेचे बलभिम शेंडगे व पोलिस पथकात पोलिस निरिक्षक नरसिंग आकुसकर , सहाय्यक पोलिस निरिक्षक भाऊसाहेब मगरे , पोलिस उपनिरीक्षक गणपती चित्ते , गजानन काळे , पोहेकॉ हबीब शेख , पोना व्यंकट जाधव , पोकॉ शिंदे , किरण वाघमारे पोलीस प्रशासना सोबत निशुल्क सेवा करणारा कोरोना योद्धा मनोज उर्फ मुन्ना गंदपवाड यांनी बेफिकीरपणे मोकाट फिरणा - यांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत .

Comments
Post a Comment