इमरान पठाण यांच्या वाढदिवसा निमित्त मुखेड शहरातील वॉर्ड क्रमांक 7 मधील नागरिकांना मोफत आर्सेनिक अल्बम-30 औषधांचे वाटप .
इमरान पठाण यांच्या वाढदिवसा निमित्त मुखेड शहरातील वॉर्ड क्रमांक 7 मधील नागरिकांना मोफत आर्सेनिक अल्बम-30 औषधांचे वाटप .
नगर परिषदचे मुख्याधिकारी विजय चव्हाण यांच्या हस्त्ते अर्सेनिक अल्बम-३० औषधांचे वाटप
मुखेड प्रतिनिधि ::- बल्खी आसद
मुखेड शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता जनतेवर या विषाणूचा दहशतीमुळे एक भीतीचे सावट तयार झाले आहे.
कोरोना विषाणूची लागन होऊ नये किंवा ह्या जैविक युध्दाच्या सामना करण्यासाठी व नागरिकांची रोग प्रतिबंधात्मक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ईमरान पठान यांच्या वाढदिवसा निमित्य मुखेड शहरातील वॉर्ड क्रमांक सात मधील नागरिकांना मोफत अर्सेनिक अल्बम-३० औषधांचे वाटप करण्यात आले.
आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला नागरिकांना दिल्याने ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने या गोळ्यांचे वाटप स्थनिक संस्था आणि राजकारण्यांकडून केले जात आहे.
दुर्दैवाने किंवा निष्काळजीपणामुळे जर या आजाराने आपल्या शरीरावर आक्रमण केलेच तर आपण याच्यावर विजय कसा मिळवु शकतो तर त्याचे उत्तर आहे आपली इम्युनीटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवून.आज आपल्या देशात लागण झालेल्या पैकी बरेच रुग्ण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे ते या रोगावर विजय मिळवून घरी परतताना दिसत आहेत.
अकबर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी मास्क, सामाजिक अंतर व हैंड ग्लोज,सॅनिटायझरचा वापर करुन अर्सेनिक अल्बम-३० औषधाचे वाटप करण्यात आले . डॉ. तौसिफ परदेशी यांनी गरजूंना औषधांचे महत्व व औषध कशा प्रकारे , व कधी घ्यायचे आहे याची माहिती पटवून दिली.
शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी फेरोज पठान,कृष्णा कामजे,शेख खाजा,अमजत पठान, कैलास मठपती , सुनील इंद्राळे , गोविंद आचेवाड , बबलू पठाण आणि आसद बलकी यांनी सहकार्य केले .
मोफत वाटप शिबीराचे नियोजन शशिकांत पांपटवार यांनी केले.

Comments
Post a Comment