मुखेड शहरात भाजी पाला फ्रूट हात गाड़े विक्रेते यांना विक्री करन्यासाठी परवानगी द्या:- शेकाप
मुखेड शहरात भाजी पाला फ्रूट हात गाड़े विक्रेते यांना विक्री करन्यासाठी सकाळी 7 ते 11 वाजे पर्यंतची परवानगी द्या:- शेकाप
मुखेड प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याचा प्रसार आटोक्यात यावा या उद्देशाने नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे दिनांक 12 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 20 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. परंतु मुखेड शहरात १० जुलैच्या मध्यरात्री पासूनच संपूर्ण मुखेड शहर कडकडीत बंद करण्याचा आदेश मा तसीलदार काशिनाथ पाटील यांनी दिला आहे त्यात अत्य आवश्यक व सेवा सोबत शेतकरी बाधवांचा भाजी पालाही बंद असल्याने दिसत आहे हे शेतकरी बाधवांचा भाजी पाला शहरातील भाजी विक्रेते घेतात परंतु संचार बंदी असल्याने शेतकरी शहरात विक्री करण्यासाठी आले असता शहर बंद आसल्याने त्याचा भाजी पाला खरेदी करणारे विक्रेतेना परवानगी नसल्याने त्यांचा भाजी पाला पूर्ण पने खराब होत आसुन तसेच शहरातील भाजी पाला फळ विक्रेत्यांना विक्री करण्यासाठी हात गाडे गल्ली बोळी मध्ये फिरून विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात यावी असे शेतकरी कामगार पक्ष मुखेड च्या वतीने मा तहिसलदार काशीनाथ पाटील यांना भाई आसद बल्खी,भाई एस के बबलु यांनी एका निवेदनाद्वारे विनंती केली आहे .

Comments
Post a Comment