लॉकडाऊनच्या काळात रामदास पाटील सुमठाणकर मित्रपरिवार ठरले खरे संकटमोचक

मुखेड - कंधार मतदार संघासाठी रामदास पाटील सुमठाणकर मित्रपरिवार ठरले खरे संकटमोचक
  गरीब ,निराधार,अपंग,गरजु लोकांना हजारो धान्य किट वाटप

    










पाटील यांची एकाही फोटोत प्रसिध्दी नाही ...आजही चालु आहे रुग्णांसाठी डब्बा,चहा नास्टा,पाणी 

मुखेड  / प्रतिनिधी :- बल्खी आसद

      मुखेड - कंधार मतदार संघातील नागरीकांसाठी लॉकडाऊनच्या काळात खरे संकटमोचक ठरले रामदास पाटील सुमठाणकर मित्रपरिवार.

         मुखेड - कंधार मतदार संघातील प्रत्येक गावात आपल्या मित्र परिवाराच्या माध्यमातून गावोगावी जाऊन हजारो धान्य किट वाटप केल्या यात मुखेड शहरासह  कुरुळा, पेठवडज, चांडोळा,जांब, बा-हाळी, मुक्रमाबाद,सावरगाव , मुक्रमाबाद , येवती अशा विविध भागातील नागरीकांना लॉकडाऊनच्या काळात मदतीचा हात दिला यामुळे अनेकांना आधार मिळाला आहे .
    तालुक्यातील दिव्यांगांसाठी शहरात तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यागांना धान्य वाटप करण्यात आले. मुक्रमाबाद सर्कल मध्येही मोठा कार्यक्रम घेऊन गोर गरीबांच्या घरात धान्य पोहचविले तर तेलंगना येथून आलेल्या मिरची तोड कामगारांना सर्वप्रथम वाडी तांडयावर जाऊन धान्य पाहचविले तर मुस्लीम बांधवांसाठी ईद साजरी करण्यासाठी शिरकुंबा साहित्य व  नगर  परिषद च्या  सफाई  कामगारांना सुध्दा धान्य  किटही दिले.

          आजही शहरात कोरोनाच्या रुग्णांसाठी व क्वारंटाईन झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी, खाजगी  रुग्णालयात आलेल्या रुग्णांसाठी रामदास पाटील मित्र परिवाराच्या वतीने डब्बा पोहचविण्याचे काम अविरत चालु आहे. रामदास पाटील हे मुखेड मध्ये लॉकडाऊनच्या काळात एकदाही आले नाहीत पण त्यांनी त्यांच्या मित्रपरिवार यांनी  केलेली मदत मुखेड - कंधार मतदार संघातील नागरीक कधीही विसरता न येणारी आहे.

         रामदास पाटील मित्र परिवाराच्या मध्यमातून  हजारो किट वाटप केल्या पण कोणी ही आपली प्रसिध्दी कधीही केलेली नाही ते कधीही एकाही फोटोत आले नाहीत केवळ मदत हीच सेवा समजून त्यांनी मतदार संघात धान्य किट पुरवली तर रामदास पाटील व त्यांच्या परिवारातील कोणताही सदस्य हे मुखेड - कंधार मतदार संघात कोणत्याच राजकीय पदावर नसताना ही मदत केली हे विशेष

तालुक्यातील प्रत्येक नागरीक व वंचित समाज बांधवापर्यंत रामदास पाटील यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. या मदतीत रामदास पाटील मित्र परिवार म्हणुन नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, ज्ञानेश्वर  डोईजड,राम सावळेश्वर , संजय वाघमारे, रमेश  राठोड , वैभव  राठोड , नामदेव श्रीमंगले, योगेश पाळेकर, संदिप पोफळे, प्रमोद मदारीवाले, नितिन टोकलवाड, जयप्रकाश कानगुले, विनोद आपटे, संदिप केंद्रे,अदनान पाशा,जावेद शेख, संतोष होनराव, जयवंत होनराव,रमाकांत पाटील जाहुरकर, भगवान गुंडावार यांच्यासह शेकडो परिवारातील सदस्यांनी नागरीकांना मदतीचा हात दिला.
        
तालुक्यातील अनेक गोर गरीबांची  विदारक परिस्थिती असताना अशा परिस्थितीत रामदास पाटील सुमठाणकर हे आशेचा किरण म्हणून  उभे  राहुन गोर गरीब, वंचितांना मदत केल्याने अनेक नागरीकांच्या मनात रामदास पाटील यांनी घर केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.