मुखेड मध्ये संचारबंदी स्थिर होताच बाजारात गर्दीचा उच्चांक,फिजिकल डिस्टन्सिंगचा पूणर्त फज्जा उडाला
मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद
कोरोना विषाणुचा बाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी विपीन इटनकर साहेब यांनी दि .१२ जुलै ते २३ जुलैपर्यंत संचारबंदी लागु केली होती आज दि .२४ शुक्रवार रोजी एका दिवसासाठी संचारबंदी स्थिर करताच परत दोन दिवस बंद राहील या भीती ने मुखेड शहरातील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झुंबड उडाली आहे . अक्षरशः एकमेकांना बाजारपेठेतून बाहेर पडण्यासाठी अशक्य झाले होते
.त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा पूणर्त फज्जा उडाला होता . शनिवार रविवार दोन दिवस संचारबंदी असल्याने तालुक्यातील नागरिकांनी नागपंचमी ची खरीदी साठी बाजारात तुफान गर्दी केली होती . संचारबंदी लागु | केलेल्यामुळे घरातील किराणा , सामान संपले असल्याने व नागपंचमी निमित्ताने कापड खरेदीसाठी परत जर लॉ कडाऊन जर लागला तर कोणाला काहीही मिळणार नाही , आपण राहून जाऊ की काय असा बेत करीत महिला पुरुषांनी आज बाजारात एकच गर्दी केली होती . भाजीपाला , किराण खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती . माणसाला माणस ठोकली जात होती . बाजारपेठेत येणाऱ्यांना व बाहेर जाणाऱ्याना निघणेही मुश्किल झाले होते एवढी झुंबड सायंकाळी पर्यंत होती . भाजीपाला अत्यावश्यक वस्तू आदी साहित खरेदी करण्यासाठी शहरात सकाळी नऊ पासून मुखेड मेन रोड , बस स्टॅंड , SBI बँक,वीरभद्र मंदिर रोड , सराफा लाईन , व डॉक्टर लाइन , या भागात ग्राहकांची गर्दीन रस्त्यांवर | एवढी गर्दी होती की , एकमेकांना अक्षरशः धक्के मारून नागरिक | जात होते . त्यामुळे कसले | फिजिकल डिस्टन्सिंग व कसले | काय , अनेकांचा तोंडाला मास्क | नव्हते , सारा फज्जा उडाला होता . दरम्यान गर्दी कमी करण्यासाठी पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ,API बि.एस मगरे ,पोलीस कॉनिस्टेबल चंदर आंबेवार,रमेश जोगपेठे नगरपरिषद कर्मचारी बलभीम शेंडगे,भारत गजलवाड,शेख नौशाद,गणेश पाटील,गौतम गवळे,शाम पोतदार,अजय बिड़ला यांनी रस्त्यावर येऊन बिना कारण फिरणार्यावर दांडूच्या प्रसाद दिल्याचे अवघ्या काहीत मिनिटांतच चौकात गर्दी कमी | झाली

Comments
Post a Comment