ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव सुरूच ! देगलुर, नायगाव आणि मुखेडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव सुरूच ! तीन तालुक्यात तीन पॉझिटिव्ह आढळले

प्रतिनिधि :- बल्खी आसद

देगलुर, नायगाव आणि मुखेडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण

नांदेड दि.06 जुलै: आज सकाळी प्राप्त अहवालांमध्ये नवीन  3 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन तीनही रुग्ण हे ग्रामीण भागातील, देगलूर, नायगाव आणि मुखेड या तालुक्यांचा समावेश आहे.

बाधित रुग्ण तपशील
• नायगाव, बोमनाळे गल्ली- 1 पुरुष वय 54
• मुखेड, तागलेन गल्ली- 1 पुरुष वय 65
• देगलुर, नाथ नगर- 1 रुग्ण वय 35

आज सकाळी पुन्हा नवीन 3 रुग्ण आढळल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या 440 झाली आहे. आतापर्यंत आजारातून बरे झालेले एकूण 321 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या 99 रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. औषध उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत पावलेल्या व्यक्तीचे राजकीय वर्तुळात वावरणे होते, संपर्कात आलेले सहा व्यक्तींना उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. एका व्यक्तीस नांदेड येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. आज  त्यांचा स्वॅब तपासणीसाठी नांदेड येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ आकाश देशमुख यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान