माजी आ. बेटमोगरेकरांच्या हस्ते विकासकामांचे भुमिपुजन व उद्घाटन संपन्न

माजी आ. बेटमोगरेकरांच्या हस्ते विकासकामांचे भुमिपुजन व उद्घाटन संपन्न


बेटमोगरा प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी

      तालुक्यातील बेटमोगरा येथे विविध विकास कामाचे भूमिपुजन व लोकार्पण सोहळा मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते दि.२४ जुलै रोजी करण्यात आले.

    नांदेड जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण सभापती सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर यांच्या स्थानिक विकास निधीतून व दलित वस्तीच्या निधीतून मंजूर झालेल्या बेटमोगरा येथील दलित वस्तीत समाज मंदिर, दोन सीसी रोड, आंगणवाडी, होलार समाज मंदिर व सीसीरोड, तिन हायमॅक्स पोल व पिवर ब्लॉक, दलित वस्तीत ४ बोअर असे अनेक विकास कामाचे दि.२४ जुलै रोजी मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते भूमिपुजन व उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच प्रतिनिधी खुशाल पाटील, माजी सरपंच सुरेश नवलेकर, चिनू पाटील, प्रकाश पाटील, महाजन ढेकळे, शिवा पाटील, बालाजी पोतदार, प्रल्हाद यरपलवाड, मष्णाजी बाऱ्हाळे, हाणमंत नारोराव नवलेकर, जनाबाई कांबळे, माधव मुदळे, रफीक दफेदार, मारोती मादाळे, बळीराम नवलेकर आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान