कोरोनाचा महा'शनि'वार; आज तब्बल 94 पॉझिटिव्ह; एका रुग्णाचा मृत्यू !
प्रतिनिधि बल्खी आसद। नांदेड दि.18 जुलै: आज सायंकाळी प्राप्त 359 अहवालापैकी 254 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी आरटीपीसीआर तपासणी द्वारे 66 अँटीजेन चाचणीद्वारे 28 असे एकूण 94 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्ण संख्या 869 एवढी झाली आहे.
आज रोजी विष्णूनगर येथील रुग्णाचा औषध उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे आजार इत्यादी आजार होते. यामुळे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 44 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सदर 44 रुग्णांपैकी 38 मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरित 6 मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत.
सध्या 349 पॉझिटिव रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यातील 27 रुग्णांची यामध्ये 14 महिला रुग्ण आणि 13 पुरुष रुग्ण यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे. प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळपर्यंत प्राप्त होतील. एकूण पॉझिटिव्ह 869 रुग्णांपैकी 476 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या केवळ 349 रुग्णांवर औषध उपचार सुरू आहेत.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Post a Comment