आज नांदेड मद्दे कोरोनाची लाट, पाचशेचा आकडा ओलांडत सहाशे कडे वाटचाल, दिवसभरात 53 रुग्ण पॉझिटिव्ह !
बाधित रुग्ण संख्या झाली 511, आजारातून बरे झालेले 341 व्यक्ती
नांदेड दि.08 जुलै: आज सायंकाळी प्राप्त अहवालामध्ये 18 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकूण भारतीय रुग्ण संख्या 511 एवढी झाली आहे. तर आजारातून बरे झालेले 6 रुग्ण यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सुट्टी देण्यात आलेल्या आतापर्यंत चार रुग्णांची संख्या 341 एवढी झाली आहे.
आज रोजी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 1 रुग्ण, श्री गुरूगोविंदसिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालय हॉस्पिटल येथील 1 रुग्ण, डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील 2 रुग्ण, हादगाव कोविड केअर सेंटर येथील 1 रुग्ण, तसेच मुखेड कोविड केअर सेंटर तेथील 1 रुग्ण असे 6 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे.
काल सायंकाळी प्रेस नोट नंतर आलेले 26, रात्री उशिरा व सकाळी आलेले 6 व 3 दिवसभरातील 18 असे एकूण 53 पॉझिटिव्ह रूग्ण आले आहेत. आज रोजी 147 पॉझिटिव रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यातील 16 रुग्णांची ( 9 महिला रुग्ण आणि 7 पुरुषांचा समावेश) प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 08/07/2020 वेळ 06.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 7376
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 6694
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 4139
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 318
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 48
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 6646
• आज घेतलेले नमुने - 176
• एकुण नमुने तपासणी- 7478
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 511 (पैकी ०४ संदर्भीत आलेले आहेत)
• पैकी निगेटीव्ह - 6235
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 237
• नाकारण्यात आलेले नमुने -106
• अनिर्णित अहवाल – 382
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 341
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 23
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 147452 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
आज सायंकाळी पुन्हा 18 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे,
नांदेड जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या ही 511 झाली आहे. आतापर्यंत 341 व्यक्ती आजारातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. सध्या 147 रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज रोजी 237 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळपर्यंत प्राप्त होतील.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे

Comments
Post a Comment