50 लाखांचा विद्यार्थ्यांचा विमा काढूनच परीक्षेला बसवणे अन्यथा अंतिम वर्षाच्या यूजीसीच्या परीक्षा रद्द करा-डॉ.रणजीत काळे
50 लाखांचा विद्यार्थ्यांचा विमा काढूनच परीक्षेला बसवणे अन्यथा अंतिम वर्षाच्या यूजीसीच्या परीक्षा रद्द करा-डॉ.रणजीत काळे
मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद
डॉ.रणजीत काळे युवक काँग्रेस कार्याध्यक्ष मुखेड,कंधार विधानसभा, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलंवार काँग्रेस प्रवक्ते दिलीप सावकार शहराध्यक्ष विशाल गायकवाड. सुनील अरगीळे आसद बल्खी आकाश कांबळे. जयप्रकाश कानगुले उपस्थित होते.
मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद
सरकारने अंतिम वर्षीच्या परीक्षा घेण्यास असमर्थ आहोत असे जाहीर केल्यानंतरही केंद्रीय गृहमंत्रालयाने परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली आहे राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूची प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे अगोदरच सर्व विद्यार्थ्यी संभ्रमात पडले आहेत त्यामुळे कोरोणाचा अशा गंभीर परिस्थितीत सरकारने परीक्षा रद्द कराव्यात. केंद्र सरकारने जरी परीक्षेसाठी परवानगी दिली असली तरी महाराष्ट्र राज्य सरकार पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द कराव्यात अशी आग्रहाची विनंती .आज महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोणा रुग्णांची संख्या वाढत आहे अशा परिस्थितीत खरच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे शक्य आहे का? हा विचार केंद्र सरकारने करायला हवा एकीकडे लोक एकत्र यायला नको म्हणून लॅकडाऊन वाढवायचा आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्या जिवाला इजा पोहोचण्याची यात कसले आहे न्याय हे देखील केंद्र सरकारने स्पष्ट करायला हवं. 5 ते 7 सात महिने महाराष्ट्रात, देशात, जगभरात कोरोना ने थैमान घातले आहे ,यामध्ये अनेक लोकांची जीवितहानी झाली अशा या काळामध्ये माझी शासनाला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यूजीसी कमिशन दिल्ली यांना ही कळकळीची विनंती आहे अशा काळामध्ये आयआयटीसारख्या टॉप मोस्ट कॉलेजेस ने त्यांच्या परीक्षा रद्द केल्या तरी आपण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून कोरणा सारख्या काळामध्ये त्यांना परीक्षेला बसून संकटात टाकू नये अशी माझी विनंती आहे आणि जर आपल्याला घ्यायचंअसदच असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याचा 50 लाखांचा शासकीय कर्मचाऱ्यां प्रमाणे विमा काढून त्यांना परीक्षेत बसवण्यात यावे.
असे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना देण्यात आले. डॉ.रणजीत काळे युवक काँग्रेस कार्याध्यक्ष मुखेड,कंधार विधानसभा, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलंवार काँग्रेस प्रवक्ते दिलीप सावकार शहराध्यक्ष विशाल गायकवाड. सुनील अरगीळे आसद बल्खी आकाश कांबळे. जयप्रकाश कानगुले उपस्थित होते.

Comments
Post a Comment