रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बेटमोगरा येथील नागरिकांना अर्सेनिक अल्बम-३० औषधांचे वाटप

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बेटमोगरा येथील नागरिकांना अर्सेनिक अल्बम-३० औषधांचे वाटप


डॉ.दत्ता पाटील बेटमोगरेकर यांच्या पुढाकार


बेटमोगरा प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी

तालुक्यातील बेटमोगरा येथे कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता जनतेवर या विषाणूचा दहशतीमुळे एक भीतीचे सावट तयार झाले आहे.

कोरोना विषाणूची लागन होऊ नये किंवा ह्या जैविक युध्दाच्या सामना करण्यासाठी व नागरिकांची रोग प्रतिबंधात्मक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी राजाई प्रतिष्ठाणचे संस्थापक डॉ.दत्ता पाटील बेटमोगरेकर यांच्या पुढाकाराने बेटमोगरा येथील तब्बल एक हजार नागरिकांना मोफत अर्सेनिक अल्बम-३० औषधांचे वाटप करण्यात आले.
या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॅथी औषधाचा वापर केल्यास फायदा होत आहे,असे नमूद आहे.या अनुषंगाने या औषधाचे वितरण करण्यात आले.
सर्वांनी आरोग्य खात्याने दिलेल्या मास्क, सामाजिक आंतर व सॅनिटायझरचा वापर करुन या औषधाचे वाटप केले.
यावेळी, बालाजी पाटील बेटमोगरेकर,प्रकाश त्र्यंबक पाटील,दत्ता पा.मुदळे,श्रीधर पाटील,पत्रकार मुस्तफा पिंजारी,दिलीप रुद्रावार,हरीहर पाटील,आदी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान