छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅन्डअप कॉमेडीमध्ये अपमान करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा - डॉ रणजीत काळे


छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅन्डअप कॉमेडीमध्ये अपमान करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा - डॉ रणजीत
काळे

प्रतिनिधि :- बल्खी आसद

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅन्डअप कॉमेडीशो मध्ये अग्रीमा जोशुआ या युवतीने अपमान केला असून  अग्रीमा जोशुआ या युवती विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी असे मुखेड युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ . रणजित काळे यांनी दि 11 रोजी तहसीलदार काशीनाथ पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली आहे . महाराष्ट्रामध्ये जर महामानवांचा अपमान होत असेल तर तो कदापी सहन केल्या जाणार नाही . यापूर्वीही अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा व महामानवांचा अपमान केला त्यांना शिवप्रेमी वेळोवेळी जागा दाखवून दिली असे जर वारंवार होत असेल तर त्याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यासाठी कठोरातील कठोर असा कायदा करून त्यांना शिक्षा करावी जेणेकरून भविष्यामध्ये कोणी महामानवांचा अपमान करणार नाही व अपमान करणाऱ्यांनी माफी मागावी अन्यथा एकही शो चालू देणार नाही असा इशाराही या निवेदनात दिला आहे . यावेळी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरोग्यरत्न डॉ . रणजीत काळे यांच्यासह सुरेश पाटील बेळीकर , सुनील आरगीळे , विशाल गायकवाड इम्रान पठाण , जयप्रकाश कानगुले , आकाश कांबळे , पत्रकार रियाज शेख , भारत सोनकांबळे , आसद बल्खी , पप्पू पायरे आदी उपस्थित होते .
शोमध्ये काय म्हणाली अग्रिमा जोशुआ ?
' शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात मी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर सर्च केलं . मला एक कोणीतरी लिहिलेला भलामोठा निबंध सापडला . पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजींचा पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे ... यामुळं महाराष्ट्रात त्यांची सत्ता येईल ... तर दुसऱ्या एकाला वाटलं क्रिएटिव्हिटी कॉन्सेंट आहे , त्यानं लिहिलं की , यात जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल . तर तिसऱ्या एका व्यक्तीनं शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा , असं लिहिलं होतं ... बस्स मी त्यालाच फॉलो केलं ' , असं तिनं तिच्या शोमध्ये म्हटलं आहे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान