नागरिकांन मधे कोरोना आजाराची जनजागृति करणे काळाची गरज: डॉ भरत जेठवाणी


नागरिकांन मधे कोरोना आजाराची जनजागृति करणे काळाची गरज: डॉ भरत जेठवाणी
 
प्रतिनिधि :- बल्खी आसद

सद्याच्या वेळे नुसार बंद हा उपाय नाही, दुकाने बंद करण्यासाठी आपण जेवढा उत्साह दाखवतो तेवढा उत्साह लोकांमध्ये कोरोना संबंधी जागृती आणण्यासाठी दाखवला तर उत्तम.

एरव्ही जागोजागी नेत्यांचे वाढदिवसाचे बॅनर  लावून शहर विद्रुप करणारे आपण आज आपल्या शहरात कोरोना संबंधी नागरिकांनी काय काय काळजी घ्यावी या बद्दलचा एकही बॅनर लावलेला नाही..

लोकांना दुकानं बंद करा सांगत फिरणारे आपण आज मात्र घरो घरी जाऊन जनजागृती करत नाही. लोकांमध्ये जागृती नसल्याने लोक गर्दी करणे, हस्तांदोलन करणे, मास्क न वापरणे वैगरे प्रकार करणे साहजिक आहे. आपण मात्र त्यांना माहिती देणे ही आपली जबाबदारी समजत नाही.

येत्या काळात अजूनही रुग्ण सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण प्रत्येक वेळी दुकानं आणि मार्केट बंद करणार आहोंत का?? गेले 3 महिने तसेही लोक बेजार झाले आहेत. आता त्यांना पोटापाण्यासाठी बाहेर पडावेच लागणार आहे. बंद हा उपाय नाही. जेव्हा शासनाने बंद पाळायला सांगितला होतं तेव्हा आम्ही मोकाट फिरत होतो. आता बंद वैगरे यशस्वी होत नाहीत, आणि सोयीचे सुद्धा नाही कळल्यावर शासनाने रुग्ण वाढत असूनही अनलॉक करायला सुरुवात केली. दुकाने हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली.  पण आम्ही सगळ्याच बाबतीत उशिरा जागे होतो. जेव्हा बंद पाळायचा तेव्हा पाळला नाही आणि लोकांना बाहेर पडून काम करणे, कमावणे गरजेचे असताना आम्ही मात्र  बंद वैगरे पाळतो.

आमच्या समोरून रोज कित्येक लोक बिना मास्क फिरतात, आम्ही मात्र त्याकडे कानाडोळा करतो. कित्येक नेते, अधिकारी, कार्यकर्ते इतर शहरातून आपल्या गावामध्ये येऊन गेले. काही नेते अजूनही येत आहेत, त्यांच्यापासून सुध्दा कोरोना संसर्ग होण्याची संभावना असते, त्यांनी मास्क गळ्यात अडकवलेला असताना सुध्दा आपण त्याच्या अगदी जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो. मास्क बाजूला सारून सेल्फी घेतो, त्यांच्याशी बोलताना चर्चा करताना त्यांना मास्क लावा म्हणून विचारणा करण्यासाठी आपल्याकडे हिम्मत नसते. पण हातावर पोट असणाऱ्या भाजीवाल्या मावशीला मात्र हटकतो. दुकानं बंद म्हणजे दुकानातले गडी, हमाल वैगरे यांचं देखील काम बंद. कुठून पोसणार आहेत तर त्यांचे कुटुंब?

कोरोना झालेल्या आपला मित्र लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्यासाठी कधी एखादा सुंदर msg आपण पाठवत नाही, पण त्याच कोरोनाबाधीत आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची नावे व्हाट्सएप।वर फॉरवर्ड करण्यात आम्हाला खूप आनंद मिळतो.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान