पडलेल्या पावसाने शहरात आला पुर घरात,दुकानात,रस्त्यावर साचले पाणीच पाणी तर नपा प्रशासन टक्केवारीत परेशान
प्रतिनिधि :- बल्खी आसद
नगरसेवकाचे बोलने ऐकुन पण घेत नाही मुख्याधिकारी साहेब तर जनतेच बोलन ऐकेल कोण :- एस के बबलु
अनेक निवेदने देऊन सुद्धा नपा प्रशासन झोपेत :-बंटी सोनकांबळे
मुखेड शहरात ०१ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता बरसलेल्या पावसाच्या पाण्याने रस्त्यावर , घरात अन
दुकानात शिरकाव केल्याने नपाच्या कामाची पोलखोल झाली . दरवर्षी पाऊस येतो अन नाल्याने न जाता सरळ तो रस्त्याने जातो आणि नागरीकांची हेळसांड करतो कधी कुणाच्या घरात , दुकानात तर अनेकवेळा नपाच्या कामाचे जणु ऑडिटच करुन जातो गेल्या ०४/०६/२०२० रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नपा ला निवेदन देण्यात आलेले होते तरी मुख्याधिकारी साहेबांना बोलण्याचा वेळ पण कार्यकर्त्यांनसाठी नव्हता गेल्या ०१ जुलै च्या पावसानेही असेच | रुप दाखविले या पावसाने अनेकांच्या घरात शिरुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात आणले . शहराच्या मुख्य बाजारपेठेत पाणीच साचुन अनेकांच्या दुकानात गेल्याने साहित्य खराब झाले तर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ ढव साचला अनपाणीच पाणी झाले.पावसाळा सुरु होण्याअगोदर शहरातील नाल्या काढल्या नसल्याने पाणी सरळ रस्त्यावर आले यामुळे नागरीकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला . मुख्याधिकारी , नगराध्यक्ष व नगरसेवका बद्दल शहरात तिव्र संताप सोशल मिडीयात पाहायला मिळाला . घनकचऱ्यावर दरमहा पाच ते सात लाख रुपये नपा खर्च करते मग एवढा भोंगळ कारभार कसा ? लाखो रुपये कोणाच्या घशात जातात ? काम होते की बिलेच उचलुन याची विल्हेवाट लावली जाते ? असे अनेक सवाल नागरीकांनी उपस्थित केले आहेत . घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेविरोधात अनेक निवेदने नागरीकांनी , नगरसेवकांनी दिली पण यावर कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही . टेंडर घेणाऱ्या संस्थेला कोणत्या राजकारण्याचा वरदहस्त तर नाही | ना ? एवढे निवेदन देऊन , कामात पारदर्शकता नसतानाही टेंडर रद्द करुन योग्य संस्थेस का दिले जात नाही ? असा सवाल सुज्ञ नागरीक विचारत आहेत पण नपाचे मात्र या सर्व बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसत असुन नागरीकांनी ओरडायचे आणि नपाने कामाचा सुपडासाफ करायचा असे तरी सध्या चित्र दिसत आहे .

Comments
Post a Comment