सरकारने विद्यार्थ्यांना परिक्षण किट समजू नये - स्वप्निल बुक्तरे

सरकारने विद्यार्थ्यांना परिक्षण किट समजू नये - स्वप्निल बुक्तरे

प्रतिनिधि :- बल्खी आसद

पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतलेला आहे. जगभरात कोरोना सारख्या भयंकर अशा महामारीच्या संकटात मानवी जीवन अडकलेले असताना,यूजीसी ने असा निर्णय घेणे म्हणजे देशभरातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न आहे.
या निर्णयामूळे प्राध्यापक व विद्यार्थ्यांना गोंधळात टाकलेले आहे.यूजीसीच्या या आदेशापूर्वी महाराष्ट्रातील राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करत मागील सत्रातील गुण गृहीत धरून सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेऊन एटीकेटी च्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना,विद्यापीठ अनुदान आयोगाने असा जीवघेणा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत असेल तर याचा नांदेड एसएफआय शहर कमिटी तीव्र निषेध करते.
केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना परिक्षण किट समजू नये व त्यांच्या जीवाशी खेळू नये असे मत नांदेड एसएफआय चे अध्यक्ष स्वप्निल बुक्तरे यांनी व्यक्त केलेले आहे.
अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत यूजीसीने ६ जुलैला जारी केलेले दिशा निर्देश रद्द करावे.या मागणीला घेऊन १० जुलैपासून अखिल भारतीय सार्वजनिक शिक्षण बचाव मंचच्या वतीने  देशव्यापी आंदोलन सुरु आहे.
याचाच भाग म्हणून आज नांदेड येथे लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करत आंदोलन करण्यात आले.
यावेळी नांदेड SFI चे सचिव शंकर बादावाड,जिल्हा कमिटी सदस्य रत्नदिप कांबळे,कैलास लोहबंदे या आंदोलनात सहभागी होते.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान