डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड


मुखेडात लोहबंदे मित्रमंडळ, शेकापसह विविध संघटनांनी केला निषेध

मुखेड  - प्रतिनिधी
     
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आल्याची माहिती कळताच आंबेडकरी अनुयायांकडून निषेध व्यक्त करण्यात आले. मुखेडात राहूल लोहबंदे मित्रमंडळ, भारतीय बौद्ध महासभा, शेतकरी कामगार पक्ष, आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देऊन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.
    राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृह ही इमारत नसून कोट्यावधी बहुजनांची अस्मिता असल्याचे मत माजी नगरसेवक राहूल लोहबंदे तर हा  हल्ला राजगृहावर नसुन बहुजनांची अस्मिता वर झालेले हल्ला  आहे असे शेकापचे  भाई आसद बल्खी यांनी व्यक्त केले. संबंधित आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार काशिनाथ पाटील यांना करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक राहुल लोहबंदे, सुरेंद्र भद्रे, शेख मुख्तार बेळीकर, अनिकेत कांबळे, अजय कांबळे, रितेश कांबळे, अशितोष कांबळे आदीसह. भारतीय बौद्ध महासभा शाखा मुखेडचे अध्यक्ष गंगाधर सोंडारे, सचिव दिपक लोहबंदे, बाबुराव घोडके, राहूल कांबळे, उत्तम गवळे, अविनाश कांबळे, गुंडेराव गायकवाड, शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष आसद बल्खी ,भाई पांडुरंग लंगेवाड, ऑल  इंडिया तन्जीम ए इन्साफचे शेख रियाज, बबलु मुल्ला आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान