मुखेडला न.पा. मुख्याधिकारी म्हणून विजय चव्हाण रुजू
मुखेडला न.पा. मुख्याधिकारी म्हणून विजय चव्हाण रुजू
प्रतिनिधि :- बल्खी आसद
मुखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांची बदली अहमदपूर येथे झाल्यामुळे कंधार येथील नायब
तहसीलदार असलेले विजय चव्हाण यांची मुखेड नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . त्यामुळे त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे . कोरूना प्रादुर्भाव दिवसागणिक मुखेड शहरात वाढत असताना मुखेड नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्याची बदली होणे हे चिंतेची गोष्ट होती मात्र शासनाच्या नियमानुसार त्यांची बदली झाली आहे . आता मुख्याधिकारी म्हणून विजय चव्हाण यांनी काल पदभार स्वीकारला आहे त्यानंतर त्यांनी कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले नागरिकांनी घरीच राहावे सुरक्षित राहावे सामाजिक अंतर ठेवावे विनाकारण घराच्या बाहेर फिरू नये अशा सूचनाही त्यांनी नागरिकांना केले आहे.श्री विजय चव्हाण हे पोलीस विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणूनही काम केले त्याचबरोबर महसूल विभागात बिलोली तहसीलदार नांदेड तहसीलदार मुखेड तहसीलदार कंधार तहसीलदार यासह प्रमुख पदावर त्यांचा कामाचा दांडगा अनुभव आहे . त्यातच त्यांना मुखेड नगर परिषदेमध्ये पुन्हा मुख्याधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळाली या अगोदर ते मुखेड चे तहसीलदार म्हणूनही प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले होते . त्याचबरोबर नायगाव तहसील कार्यालयात तहसीलदार या पदाचाही चांगल्या पद्धतीने वापर करून नागरिकांची सर्वसामान्यांची कामे करून नागरिकाला प्रशासनाबद्दल विश्वास दाखवला होता त्याचा प्रत्यय मुखेडमध्ये येत्या काळात दाखवतील अशी अपेक्षा शहरवासीय कडून व्यक्त होताना दिसते 
Comments
Post a Comment