बेटमोगरा येथील कै.बळीरामजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा घवघवीत यश

बेटमोगरा येथील कै.बळीरामजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा घवघवीत यश


९६.८८ टक्के निकाल मिळवून दर वर्षीप्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा राखली

बेटमोगरा प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी

नुकत्याच फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये झालेल्या इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकाल हाती आला असून यामध्ये तालुक्यातील बेटमोगरा येथील कै.बळीरामजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय बेटमोगरा याने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी ९६.८८ टक्के निकाल मिळवून यशाची परंपरा राखली आहे.
यामध्ये इयत्ता बारावी कलेतील विद्यार्थ्यांनींचा निकाल खालील प्रमाणे आहे, कु.चनेबोइनवाड रुपाली ७४.७६ टक्के, शेख फरीन फारुख ७३.३० टक्के, पंदिलवाड दैवशाला ७१.५३ टक्के, शेख निशाद ७०.९२ टक्के, सय्यद मुस्कान ६४.९२ टक्के, सुर्यवंशी राधिका ६४.६१ टक्के, मुदळे शिला ६४.३० टक्के, भोसले आश्वीनी ६४.३० टक्के, टेकाळे ज्योती ६२.९२ टक्के, सोनकांबळे संध्या ६१.३८ टक्के असा घवघवीत यश संपादन करुन सावित्रीच्या लेकींनी बेटमोगरा परिसरात नावलौकिक केला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल या संस्थेचे सचिव तथा मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या सह
प्रा.इंगोले सर, कुलकर्णी सर, बिरादार सर,अब्दुल वाहेद सर, शिंदे सर,ताटे सर,कळसे सर,लष्करे सर, पाटील सर,भोसले सर सह आदींनी या विद्यार्थ्यांनीच्या अभिनंदन व कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान