आमदार डॉ तुषार राठोड यांच्या पुढाकाराने बेटमोगरा येथील ग्रामस्थांना मास्क वाटप

आमदार डॉ तुषार राठोड यांच्या पुढाकाराने बेटमोगरा येथील ग्रामस्थांना मास्क वाटप


मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी

संपूर्ण मानवजातीवर अदृश्य शत्रु कोरोना महामारीने थैमान घातला असून जिल्ह्यासह मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे या विषाणूने सुद्धा दमदार प्रवेश केला आहे.
या विषानूपासुन बचाव करण्यासाठी आरोग्य खात्याने मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर असे सक्तीचे केले आहे.त्याच अनुषंगाने बेटमोगरा येथील कोरोना महामारीपासुन ग्रामस्थांचा बचावासाठी मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ तुषार राठोड यांच्या पुढाकाराने दि.४ जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रमुख हस्ते एक हजार मास्कचे वाटप करण्यात आले.
तसेच सर्वांनी आरोग्य प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे,मास्कचा वापर, सामाजिक आंतर करून स्वत: व कुटुंबीयांचे आरोग्य जपावे असे ही आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता पाटील बेटमोगरेकर यांनी ग्रामस्थांना केले.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान