नांंदेेड सोमवारी 51 कोरोना बाधीत रुग्ण तर मुखेडचे 13 कोरोना पीड़ित, रुग्ण संख्या -986
आज 5 रुग्ण बरे, आजारातून बरे झालेले 515 रुग्णांना सुट्टी देण्यात आली
नांदेड दि.20 जुलै: आज सायंकाळी प्राप्त 332 अहवालापैकी 223 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी आरटीपीसीआर तपासणी द्वारे 33 अँटीजेन चाचणीद्वारे 18 असे एकूण 51 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्ण संख्या 986 एवढी झाली आहे.
काल 19 जुलै रोजी हिंगोली नाका, नांदेड येथील 64 वर्षीय महिलेचा व आज नायगाव येथील 26 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदरील रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरू होते. तसेच देगलूर नाका येथील 65 वर्षीय पुरुषाचा औषध उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. सदर 64 वर्षीय महिला व 65 वर्षे पुरुषाचास उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे आजार इत्यादी आजार होते. 26 वर्षीय महिलेस किडनीचे गंभीर आजार होते. यामुळे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 49 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सदर 46 रुग्णांपैकी 42 मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरित 7 मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत.
सध्याा 423 पॉझिटिव रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यातील 31 रुग्णांची यामध्ये 17 महिला रुग्ण आणि 14 पुरुष रुग्ण यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे. प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळपर्यंत प्राप्त होतील. एकूण पॉझिटिव्ह 986 रुग्णांपैकी 515 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या केवळ 423 रुग्णांवर औषध उपचार सुरू आहेत.
रविवारी आढळलेले बाधित रुग्ण तपशील:
आरटीपीसीआर प्रणाली चाचणी मध्ये ३३ रूग्ण
नांदेड : ०७
जि.एस.सी विष्णुपुरी नांदेड : ०४
कसराळी बिलोली : ०२
समता नगर मुखेड : ०३
शिवाजीनगर मुखेड : ०३
मुक्रामाबाद मुखेड : ०६
बामणी मुखेड : ०१
शारदानगर देगलूर : ०१
खाजबाबा देगलूर : ०१
मोंढा मार्केट यार्ड लोहा : ०१
सिद्धार्थ नगर नायगाव : ०१
कोलंबी नायगाव : ०१
विजय सुलेमान टेकडी कंधार : ०१
भोकरदन जि.जालना : ०१
अँटीजेन टेस्ट चाचणीमध्ये १८ रूग्ण
नांदेड : १८
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 20/07/2020 वेळ 07.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित -9715
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 8648
• पैकी निगेटीव्ह - 8498 • नमुने तपासणी अहवाल बाकी- 98
• नाकारण्यात आलेले नमुने -197
• अनिर्णित अहवाल – 530
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 515
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 49
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 148256 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

Comments
Post a Comment