आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार भाई जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना सारख्या महामरित बडेजाव न करता सामाजिक संदेश देण्या साठी मालेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.वृक्ष लागवड करताना पर्यावरणाच्या समतोलासाठी देशी वृक्ष सीताफळ, कडू लिंब यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी शेकाप कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाशिष कामेवार, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ एस एस शिंदे, पिंटू तारु, रोहन गायकवाड, प्रीतम कांबळे या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे वृक्ष लागवड करताना सामाजिक अंतराचा नियम पाळण्यात आला.

Comments
Post a Comment