नांदेड सेलूची कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात रात्री 10.15 वाजता महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नांदेड:- नांदेड येथे चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झालेल्या एका ६४ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सांयकाळी समजले. दि.३० एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. सेलूची (परभणी) येथील रहिवासी असून ती नांदेडमध्ये आपल्या दोन मुलांसोबत आली होती अशी माहिती आहे. ती महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर तिच्या दोन्ही मुलांना कारन्टाईन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सेलू येथील ६० वर्षीय महिला दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्या महिलेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. 26 एप्रिल रोजी ती महिला सेलूस आली. दोन दिवस कुटुंबियाबरोबर राहिल्यानंतर तेथून उपचारानिमित्त ती महिला दि.28 एप्रिल रोजी नांदेडला रवाना झाली. शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथील रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरु असतांना तेथील वैद्यकीय अधिका-यांनी कोरोना तपासणी संदर्भात स्वॅब घेतला असता, अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. तेंव्हा ती महिला कोरोनाबाधित ...