बेटमोगरा येथील ग्रा.पं.कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

बेटमोगरा येथील ग्रा.पं.कार्याल्यात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

 प्रतिनिधी ( मुस्तफा पिंजारी )


धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जिवनातील जेष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष,लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची ८८९ वी जयंती दि.२६ एप्रिल रोजी तालुक्यातील बेटमोगरा येथील ग्रा.पं.कार्यालयात साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च पासून लॉकडाऊन घोषित केला आहे, तसेच ग्रिन झोन मध्ये असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कुठलाही जमाव न करता सरकारच्या जमावबंदी कायद्याचे व सोशल डिस्टंसिंग च्या काटेकोरपणे पालन करुन जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८८९ वी जयंती बेटमोगरा येथील ग्राम पंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून एकदम साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
यावेळी,सरपंच सौ.पद्मजा पाटील,दत्ता पाटील मुदळे,ग्रामसेवक स्वामि,तलाठी रवि कापसे,धनराज पाटील,प्रकाश पाटील,बाबु पा.कर्णेकर, खुशाल पाटील,शिवदास डोईबळे, उत्तम पाटील,गजु पाटील,कपील पाटील,हारी पाटील,सचिन पाटील, विशाल पाटील आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान