नांदेडचा पहिला ६४ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह
नांदेडचा पहिला कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्हमुखेड /प्रतिनिधि:- बल्खी आसद
नांदेड शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या जिल्ह्यामध्ये २२ एप्रिल पर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता. पीर बुऱ्हान या भागात कोरोना रुग्ण आढळला होता. रुग्णाचे वय 64 आहे, या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यासारखे गंभीर आजार आहेत. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले, या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत एकूण घेण्यात आलेले स्वँब 737 असून त्यापैकी 2 रुग्णांचा स्वँब पॉझीटिव्ह आढळला होता. नंतर प्रशासनाच्यावतीने संबंधित भाग सील करण्यात आला होता.
या रुग्णाला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. नांदेड शहरातील अबचलनगर येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल रविवार 26 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला असून या रुग्णाची प्रकृती स्थीर आहे. तर शहरातील पीर बुऱ्हाण नगरमध्ये ६४ वर्षीय व्यक्ती आता कोरोनामुक्त झाली आहे. या व्यक्तीनेेे कोरोनाला हरवत, विजय मिळवला आहे. या बातमीने नांदेडकरामध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
६४ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझीटिव्ह असल्याचा अहवाल २२ एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. उपचारानंतर आज सदरील रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
व पीर बुऱ्हान येथील रविवारी पाठवलेल्या रुग्णाचा स्वॅब चा दि.२७ रोजी अहवाल निगेटिव्ह आला असून आणखी दोन अहवाल येणे बाकी आहे. चौदाव्या दिवशी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.
नांदेडकरांना पीर बुऱ्हान भागातील रुग्णासह 9 संशयित रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Comments
Post a Comment