क्रांतिसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती घरीच साजरी करावी - अविनाश भोसीकर
क्रांतिसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती घरीच साजरी करावी - अविनाश भोसीकर
प्रतिनिधी / बल्खी आसद
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कुठलाही जमाव न करता दि.२६ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य,जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती नांदेड जिल्हातील तमाम जनतेनी घरीच साजरी करावी असे आवाहन बसव ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी केले आहे.देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून देशासह राज्यात सुद्धा दिवसेंदिवस
रुग्ण वाढतच असल्याने शासनाने २२ मार्च पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन व
जमावबंदी कायदा लागू केला आहे,अशा परिस्थितीत कोणताही जमाव न करता शासनाने
दिलेल्या आदेशाचे व सोशल डिस्टन्सिंग तंतोतंत पालन करुन नांदेड जिल्हातील
तमाम जनतेनी येणाऱ्या २६ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य, जगतज्योती महात्मा
बसवेश्वर यांची जयंती घरीच राहून एकदम साध्या पद्धतीने साजरी करावे असे
आवाहन बसव ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी केले आहे.

Comments
Post a Comment