कोरोनाचा नांदेडमध्ये ३ रा रुग्ण आढळला
कोरोनाचा नांदेडमध्ये ३ रा रुग्ण आढळला
उपच्चारासाठी दाखल असलेल्या ६० वर्षीय महिलेचा अहवाल आज पॉझिटिव आला आहे.
मुखेड /प्रतिनिधि :- बल्खी आसद
नांदेड दि. 29 : जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचे एकुण दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळली होती. नांदेड येथे दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झालेल्या एका ६४ महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सांयकाळी उघडकीस आले.ही महिला सेलूची(परभणी) रहिवासी असून ती नांदेडमध्ये आपल्या दोन मुलांसोबत आली होती अशी माहिती आहे.ती महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर तिच्या दोन्ही मुलांना कारन्टाईन करण्यात आल्याचे सांगण्यात येते.ती महिला नांदेडमध्ये का आली, कशासाठी आली हे मात्र कळू शकले नाही.
ही धक्कादायक माहिती हाती आल्याबरोबर जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिका-यांसह कर्मचा-यांची दोन पथके तातडीने बुधवारी रात्री उशिरा सेलूस रवाना केली आहेत. दरम्यान, त्या महिलेच्या कुटुंबियांतील अन्य व्यक्तींची वैद्यकीय तपासणी या पथकाद्वारे केली जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.
सेलू येथील ६० वर्षीय महिला दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्या महिलेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. 26 एप्रिल रोजी ती महिला सेलूस आली. दोन दिवस कुटुंबियाबरोबर राहिल्यानंतर तेथून उपचारानिमित्त ती महिला दि.28 एप्रिल रोजी नांदेडला रवाना झाली. तेथील रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरु असतांना तेथील वैद्यकीय अधिका-यांनी कोरोना तपासणी संदर्भात स्वॅब घेतला. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. तेंव्हा ती महिला कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर नांदेड जिल्हा प्रशासनाने तातडीने त्या महिलेच्या कुटूंबियांसह परभणी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास सतर्क केले. पाठोपाठ वैद्यकीय अधिका-यांसह कर्मचा-यांचे एक पथक तातडीने सेलूस रवान झाले. दुसरे पथक रात्री उशिरा पावणे नऊच्या सुमारास सेलूस रवाना झाले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: २९ एप्रिल २०२० सायं. ५ .०० पर्यंत
▪️एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 2
▪️आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन - 1020
▪️क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 291
▪️अजून निरीक्षणाखाली असलेले - 67
▪️पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 121
▪️घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -899
▪️आज तपासणीसाठी नमुने घेतले- 100
▪️एकुण नमुने तपासणी- 899
▪️पैकी निगेटीव्ह -791
▪️नमुने तपासणी अहवाल बाकी- 99
नाकारण्यात आलेले नमुने - 5 , काहीही निष्कर्ष न निघालेले - १ जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 83100 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

Comments
Post a Comment