‘त्या’ कोरोनाग्रस्त रुग्णाचे स्वॅब पुन्हा तपासणीसाठी पाठवा :- आ.अमरनाथ राजूरकर

‘त्या’ कोरोनाग्रस्त रुग्णाचे स्वॅब पुन्हा तपासणीसाठी पाठवा
 

आ.अमरनाथ राजूरकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
 

 मुखेड /प्रतिनिधि :- बल्खी आसद


नांदेड - ग्रीनझोनमध्ये असलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अचानक 22 एप्रिल रोजी एक कोरोनाचा रुग्ण सापडला आणि सर्व जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले. खबरदारीची उपाय योजना म्हणून ज्या भागात हा रुग्ण सापडला त्या भागाला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करीत
 असतांनाच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 80 जणांचे स्वॅब तपासल्या गेले. परंतु या सर्व स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला. यावरुन निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी त्या कोरोनाग्रस्त रुग्णांचे स्वॅब पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवावेत अशी मागणी विधान परिषदेतील
 काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
या संदर्भात त्यांनी असे म्हटले आहे की, कोरोना हा संसर्गजन्य विषाणू आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला या विषाणूचा तात्काळ संसर्ग होतो, असा आत्तापर्यंतचा या विषाणूचा इतिहास आहे. नांदेड शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली.
 प्रशासन अधिक सतर्क झाले. ज्या भागात हा रुग्ण सापडला तो सर्व भाग सील करण्यात आला. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 80 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. परंतु सर्वच्या सर्व 80 अहवाल निगेटिव्ह आले. यावरुन तो रुग्ण खरचं कोरोनाग्रस्त आहे का? असा प्रश्न पडला आहे.
जर तो कोरोनाग्रस्त असेल तर त्याच्या संपर्कात आलेल्या एखाद्या तरी व्यक्तीस याचा प्रादूर्भाव नक्कीच झाला असता, परंतु  आपल्या सर्वांच्या सुदैवाने सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
 हा कोरोनाग्रस्त रुग्ण अनेक दिवसांपासून अस्थमा व मधुमेह या आजाराने पिडीत आहे. तसेच तो वारंवार आजारी पडतो अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे या रुग्णाच्या स्वॅबची पुन्हा तपासणी करणे गरजेचे आहे. जर पुन्हा आलेला अहवाल सुदैवाने निगेटिव्ह आला तर
 नांदेड जिल्ह्यासाठी ही बातमी मोठी आनंदाची असणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्या रुग्णाचे स्वॅब तपासणीसाठी पुन्हा एकदा पाठवावेत अशी विनंती आ.अमरनाथ राजूरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना केली आहे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान