वैद्यकीय संस्था व आय.एम.ए. तर्फे महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसह विधवा, निराधार महिलांना २०० जीवनावश्यक वस्तू, धान्याचे किट वाटप

वैद्यकीय संस्था व आय.एम.ए. तर्फे २०० महिलांना जीवनावश्यक किटचे वाटप


मुखेड : प्रतिनिधी  बल्खी आसद




 मुखेड :- शहरातील वैद्यकीय संस्था मुखेड व इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) च्या वतीने शहरातील नगर परिषदेच्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसह विधवा, निराधार महिलांना २०० जीवनावश्यक वस्तू, धान्याचे किट वाटप करण्यात आले.
उपरोक्त संस्थेच्या वतीने प्रधानमंत्री सहायता निधी (कोव्हीड १९) साठी २ लक्ष रु.संकलित करुन निधी लवकरच प्रशासनाकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले.
तहसील कार्यालयाच्या सभागृहात दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) चे सचिव डाॅ.रामराव श्रीरामे, अध्यक्ष डाॅ.व्यंकटराव सुुुभेदार यांंच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी गणाचार्य मठाचे विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, आ.डाॅ.तुषार राठोड, नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर, मुखेड भुषण दिलीपराव पुंडे, डाॅ.अशोक कौरवार, डाॅ.
व्यंकटराव सुभेदार, डाॅ.रामराव श्रीरामे, डाॅ.शेख फारुक अहमद, डाॅ. पांडुरंग श्रीरामे, डाॅ.
आर.जी.स्वामी, डाॅ.एम.जे.इंगोले, डाॅ.अविनाश पाळेकर, डाॅ.श्रावण रॅपनवाड, डाॅ.रणजित काळे, डाॅ.वीरभद्र हिमगीरे, डाॅ.राहुल मुक्कावार, डाॅ. शैलेंद्र कवटीकवार, डाॅ. पृथ्वीदास पत्की, डाॅ.प्रल्हाद नारलावार, डाॅ. तौसिफ परदेसी, डाॅ. विठ्ठल शेटवाड, आदी उपस्थित होते.
तसेच वैद्यकीय संस्था मुखेड व इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.)च्या वतीने प्रधानमंत्री सहायता निधी (कोव्हीड १९) साठी २ लक्ष रु.संकलित करुन निधी लवकरच प्रशासनाकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान