मुंबईत करोनाबाधितांसाठी नवे रुग्णालय.

मुंबईत करोनाबाधितांसाठी नवे रुग्णालय.

मुंबई :-

करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबई महापालिका सातरस्ता येथील कस्तुरबा रुग्णालय परिसरात लवकरच खास करोनाग्रस्तांवरील उपाचारांसाठी नवे रुग्णालय बांधणार आहे.
तळमजला अधिक दोन मजल्यांच्या या इमारतीचे बांधकाम चीनच्या धर्तीवर प्री- इंजिनीअरर्ड पद्धतीने केले जाणार आहे. या कामासाठी टेंडर निघाले असून, पुढील महिन्यात मेपासून इमारतीचे बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे.

करोनाची साथ वाढतच चालल्याने त्यावर दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता असल्याने पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे.
कस्तुरबा रुग्णालयासह उपनगरातील 19 रुग्णालये, खासगी रुग्णालये, हॉटेल, लॉजिंग-बोर्डिंग याठिकाणी उपचार आणि विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 मात्र सध्याच्या रुग्णांची वाढती संख्या पाहाता आणि येत्या काळात करोनाचा वाढता धोका पाहाता एक विशेष रुग्णालय आवश्यक असल्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे.

करोनासारख्या आजारावर प्रभावी उपचार करता यावेत यासाठी हे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.
विषाणूजन्य आजारावर उपचार करणारे पालिकेचे कस्तुरबा हे विशेष रुग्णालय आहे. या ठिकाणी 250 खाटा, दहा व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच या रुग्णालयात करोना चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळाही सुरू करण्यात आली आहे.
 उपचाराची क्षमता वाढविण्यासाठी नवीन करोना रुग्णालयातील वॉर्डमध्ये 47 खाटा असतील. शिवाय सहा खाटांचे आयसीयू आणि इतर रूममध्ये प्रत्येकी सात खाटा असतील. निर्जंतुकीकरणासाठी विशेष कक्षही असेल, अशी माहितीही या अधिकार्‍याने दिली.

हे रुग्णालय प्री-इंजिनीअरर्ड पद्धतीने बनवले जाणार असून या पद्धतीने इमारत उभारण्यासाठी लागणारे साहित्य हे कारखान्यात बनवले जाते आणि त्याची जोडणी प्रत्यक्ष जिथे इमारत बांधली जाते तिथे केले जाते.
या पद्धतीने काम वेगाने तसेच अचुक होत असल्याचा दावा केला जातो. चीनच्या वुहान शहरात प्री-इंजिनीअरर्ड पद्धतीने फक्त दहा दिवसांत तब्बल एक हजार खाटांची क्षमता असणारी दोन रुग्णालये उभारण्यात आली आहेत.
तसेच 14 विलगीकरण केंद्रेही उभारण्यात आली आहेत. चीनमधीलच्या करोनाच्या थैमानात या रुग्णालयाचा मोठा उपयोग झाला.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान