नासिक भद्रकाली झोपडट्टीला आग 100 ते 150 कुटुंब बेघर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदीत नासिक भद्रकाली झोपडट्टीला आग 100 ते 150 कुटुंब बेघर

प्रतिनिधि :-

कोरोणा आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदी कालावधीत नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात असलेल्या भिमवाडी सहकार नगरपालिका परिसरातील झोपडपट्टीला शनिवारी सकाळी आग लागून शंभर ते दीडशे घरे भस्मसात झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली
 असून अनलॉक डाउन संचारबंदी कालावधीत या परिसरातील नागरिकांना बेघर होण्याची वेळ येऊन ठेपली आहे सुमारे दोन तास चाललेल्या या जागेवर अग्निशमन दलाला नियंत्रण मिळविण्यात यश आले अतिशय दाट लोकवस्तीचा आणि अरुंद गल्लीबोळा असलेला हा परिसर काही क्षणातच
 या भिमवाडी सहकार नगर परिसरातील झोपडपट्टीतील सर्व शंभर ते दीडशे घरे काही क्षणातच भस्मसात झाली विशेष म्हणजे या परिसरातील असलेल्या घरांमध्ये बहुतेक घरांमध्ये सिलेंडर असल्यामुळे सिलेंडरचा स्फोट होऊन आगीने अधिकच रौद्ररूप धारण केले होते नेमके आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही
घटनास्थळी नाशिक जिल्ह्याचे खासदार हेमंत गोडसे नगरसेविका हेमलता पाटील महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली व प्रशासनाला उपाययोजना करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकारी यानी दिलेत याठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात
 गर्दी झाल्यामुळे भद्रकाली पोलीस स्टेशन मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता आता नेमके या कालावधीमध्ये बेघर झालेल्या या नागरिकांना शासन कुठल्या पद्धतीचने मदत करते लॉक डाऊन आणि सोशल डिस्टन्स सिंग या सर्व गोष्टी पाहता कोरोना आजाराचा प्रादुर्भाव
वाढू नये यादृष्टीने या दीडशे बेघर लोकांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने नाशिक मनपा आयुक्त नाशिक जिल्हा प्रशासन करते याकडे लक्ष लागून आहे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान