स्वस्त धान्य घोटाळा करणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करा.:-दशरथरावजी लोहबंदे
धान्य घोटाळा करणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करा. :-जि प सदस्य दशरथरावजी लोहबंदे अधिकाऱ्यांना एक तास धरले धारेवर २४ तासात माहिती देण्याची मागनी.
मुखेड:- प्रतिनिधी बल्खी आसद
कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी उपाय म्हणून लाॅकडाऊन व संचारबंदी करण्यात आली .नागरिकसंना हाताला काम नाही.या मुळे गोर गरिब जनतेची उपासमारी रोखण्यासाठी धान्य, जिवनाशक वस्तु व शासनाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या धान्याचा काळाबाजार करत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी व २४ तासात याची माहिती द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे यांनी तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्याकडे दिनांक २९ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना संसर्ग आजारामुळे देशासह राज्यात संचारबंदी करण्यात आली. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांच्या हाताला काम नाही तर विधवा महिला, एकल महिला व दिव्यांगां सह कामगारांच्या हाताला काम नाही .काम करून पोट भरणाऱ्या अशा कुटुंबांची उपसणारी होत असल्यामुळे शासनाच्या वतीने व काही राजकीय पुढाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गरजुंना धान्य व घरगुती जिवनाशक वस्तूंचे वाटप केले पण हे तहसिलच्या पुरवठा विभागाकडे जमा झाल्या किती व गरजूंना दिल्या किती याचा मात्र मेळ नाही. या बरोबरच तालुक्यात २०० च्या जवळपास स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या योजनेतील लाभ धारकांना धान्य वाटप करण्यात येत आहे.आणि तालुक्यात दोन गोदामातुन धान्य पुरवठा केला जातो.या गोदामातील धान्य गोदाम पालक व संबंधित अधिकारी संगनमत करुन प्रत्येक पोत्या मागे २ ते ३ किलो धान्य कमी दिले जाते. हे असे कसे म्हणजे धान्यांची चोरी
केली जात आहे.तरी अशा जागतिक संकट काळात अधिकारी व गोदामपालावर चौकशी करुन कार्यवाही करावी व २४ तासात हि सगळी साक्षांकित प्रतीत माहिती द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेडेवाड, प्रभाकर बाबुरव कागदेवाड यांनी स्वाक्षरी करुन निवेदनातुन केली आहे.
या वेळी दत्ताञय पाटील बेटमोगरेकर, नागनाथ पाटील बेळिकर ,यशवंत बोडके,सुशिल पत्की हे ही उपस्थित होते.
Comments
Post a Comment