नांदेडमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला

नांदेडमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला, रुग्णाला सरकारी दवाखान्यात केलय दाखल
मुखेड /प्रतिनिधि :- बल्खी आसद
अबचलनगर येथील रहिवासी आहे, जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दिलीय माहिती, नांदेडचा धोका वाढण्याची चिन्हे.
नांदेड़ शहरात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला, रुग्णाला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.अबचलनगर या भागातील हा रहिवासी आहे. रुग्णाला सरकारी दवाखान्यात केलय दाखल, नांदेडचा धोका वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
नांदेड जिल्ह्यात एकुण 962 संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी घेण्यात आलेले स्वॅब एकूण 688 आहेत. त्यापैकी 629 निगेटिव्ह असून 53 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण 5 स्वॅब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: २६ एप्रिल २०२० सायं. ५ .०० पर्यंत
▪️आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन - 863
▪️क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 275
▪️अजून निरीक्षणाखाली असलेले - 110
▪️पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 42
▪️घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 821
▪️आज तपासणीसाठी नमुने घेतले- 49
▪️एकुण नमुने तपासणी- 688
▪️पैकी निगेटीव्ह - 629
▪️नमुने तपासणी अहवाल बाकी- 53
नाकारण्यात आलेले नमुने - 5
▪️जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 81096 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment