नांदेड अबचलनगर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून सील :- नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

अबचलनगर हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात जनतेने घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे :-जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड, 
दि. 27 एप्रिल: कोव्हीड-19 च्या अनुषंगाने नांदेड शहरात अबचलनगर भागातील 44 वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल काल (26 एप्रिल रोजी) पॉझिटिव्ह आला आहे. त्या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) येथे उपचार सुरु आहेत. नांदेड शहरातील अबचलनगर हा भाग कंटेनमेंट झोन (अटकाव) म्ह णून सील करण्यात आला आहे. या सील करण्यात आलेल्या भागातील जनतेने घरातच रहावे. या भागात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संभावित संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलिस तैनात करण्यात आली आहेत. जनतेने घाबरुन न जाता, प्रशासनाने दिलेल्यार निर्देशाचे पालन करावे आणि अत्यंत आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडु नये, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान