वैधकिय सेवा देत केला सामाजिक योगदान
वैधकिय सेवा देत केला सामाजिक योगदान...
वडगाव आरोग्य उपकेंद्राचे डाॅ.सरोज जाधव यांनी गरीब गरजुनां केले धान्याचे शभंर किट वाटप
वडगाव आरोग्य उपकेंद्राचे डाॅ.सरोज जाधव यांनी गरीब गरजुनां केले धान्याचे शभंर किट वाटप
शासकिय सेवेत काम करत असुनही समाजाप्रती आपुलकी बाळगणारे समाजसेवक आज घडीला केवळ बोटावर मोजण्या इतकेच पंरतु शासकिय सेवेत असुनही सामाजिक सेवेची तळमळ असनारे मौजे वडगाव आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत असलेले डाॅ. सरोज जाधव यांनी उपकेंद्रातील पाच गावामध्ये शंभर किट धान्य गोरगरीब व गरजुंना दि.२३ एप्रील रोजी वाटप केले.
संबंध जगाला हादरवुन सोडणा-या कोरोना या महामारीवर वर मात करण्यासाठी केंद्र सरकारने लागु केलेल्या लाॅकडाऊन काळात मोलमजुरी न करता घरातच बसुन रहावे लागत असल्यामुळे त्यांच्या परिवाराची अन्नधान्यामुळे उपासमार होवु नये या उद्देशाने डाॅ. सरोज जाधव हे आपले वडील तथा मुखेड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गंगाधरराव पाटील जाधव व त्यांचे पती प्रा. डाॅ. माधव श्रीधर कदम यांच्या संकल्पनेनुसार उपकेंद्रांतर्गत असलेल्या वडगाव, डोरनाळी, निवळी , चव्हाणवाडी व खोबातांडा या गावातील गोरगरीब गरजु लोकांना डाॅ. सरोज गंगाधरराव जाधव, कु योगेश्वरी गंगाधर पाटील, आशिष इंगोले (Recently Selected LIC DO), कु.आरती इंगोले, व सिद्देश्वर हिवराळे यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले यावेळी त्या त्या गावातील संरपच, पोलिस पाटील, ग्रा.प.सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व नागरीकांची उपस्थिती होते.

Comments
Post a Comment