मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू



मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

 मुंबई:-
मुंबईत करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांप्रमाणेच अहोरात्र सेवा देणार्‍या पोलीस दलात करोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील एका 57 वर्षीय करोनाबाधित कॉन्स्टेबलचा आज नायर रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

मुंबईत करोनामुळे पोलिसाचा झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. वाकोला येथे ड्युटीवर असलेल्या सदर कॉन्स्टेबलला 22 एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान,
त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हे पोलीस कॉन्स्टेबल वरळी येथे वास्तव्याला होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.