पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप सारगाव पीर प्रतिनिधी:- शेख चांदपाशा सध्या कोरोना विषाणूचा देशात वाढता प्रदूर्भाव पाहता देशात लॉकडाउन करण्यात आले , या लॉकडाउन मध्ये उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून मुखेड तालुक्यात पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब व काँग्रेस पक्षाच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले . त्यात मुखेड तालुक्यातील मौजे सावरगाव पीर येथील काँग्रेस पक्षाचे नेते ,व माजी सरपंच शौकतखान पठाण यांच्या प्रयत्नाने सावरगाव येथील गरजू ,अपंग, वृद्ध, गरीब, लोकांना धान्य वाटप करण्यात आले. पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्ष्यातर्फे 40 गरजू लोकांना धान्य किट सावरगाव नगरीचे सरपंच संगमेश्वर देवक्तते यांच्या हस्ते देण्यात आले, यावेळी तलाठी खिल्लारे मॅडम , प्रकाश पाटील, लक्ष्मण हुरजळ, हणमंत कांबळे, प्रा.गणेश वाघमारे, उपस्थित होते.
Comments
Post a Comment