दशरथरावजी लोहबंदे परीवारांनी केली 700 कुटुंबियांना घरपोच धान्य वाटप

दशरथरावजी  लोहबंदे परिवाराची सामाजिक बांधिलकी

700  कुटुंबियांना घरपोच धान्य वाटप 


मुखेड / प्रतिनिधी :- बल्खी आसद
   
शहरातील फुलेनगर भागातील एकुण सातशे कुटुंबियांना व पांडुर्णी येथिल गरजुंना सामाजिक बांधिलकी जोपासत जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे परिवाराच्या वतीने मास्क व धान्य वाटपास सुरूवात करण्यात आले. यावेळी राहूल लोहबंदे, दिपक लोहबंदे यांनी पुढाकार घेतला.
      संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूच्या व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. यामहारोगावर विजय मिळविण्यासाठी संपूर्ण देश लाॅक डाऊनच्या माध्यमातून एकजुटीने लढा देत आहे. लाॅकडाऊनमुळे ज्यांचे हातावर पोट अश्या कामगार, निराधार, कष्टकरी गरजू कुटुंबियांची मागासवर्गीय वस्ती
असलेल्या फुलेनगर येथील सर्व नागरिकांना गहू-तांदुळ आदी धान्याचे व कापडी मास्क घरपोच वाटप करण्यात आले.
     यावेळी तहसीलदार काशीनाथ पाटील, नगराध्यक्ष बाबुराव  देबडवार, जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, सहा. पोलीस निरिक्षक भाऊसाहेब मगरे, पोलिस उपनिरिक्षक जि.डी. चित्ते, डाॅ.रामराव श्रीरामे, नगरसेवक प्रा . विनोद आडेपवार, नगरसेवक प्र. दिपक लोहबंदे,
माजी नगरसेवक राहुल लोहबंदे सह ईस्माईल बागवान, रियाज शेख, गौतम कांबळे, रितेश कांबळे, राहुल कांबळे, माधव पोटफोडे
तर पांडुर्णी येथे माजी सरपंच बापूराव कांबळे जुन्नेकर,  सरपंच लिंगुराम पेनलेवाड, ग्रामविकास अधिकारी नजीर सय्यद, तलाठी कु. एस. एम.कोनाळे, रुपाली वाघमारे, प्रभाकर कागदेवाड, गोविंद सुर्यवंशी, नामदेव किनवाड आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान