मुखेड पोस्ट ऑफिसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न एका आरोपीस तात्काळ अटक
मुखेड पोस्ट ऑफिसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न एका आरोपीस तात्काळ अटकमुखेड / प्रतिनिधी बल्खी आसद
मुखेड शहरातील मोंढा भागातील पोस्ट ऑफिसवर दि. 22 रोजीच्या मध्यरात्री चोरटयांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न अयशस्वी झाला. चोरीची बातमी पोलिसांना कळताच आपल्या तपासाची सुत्रे हलवून एका आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली. मोंढा भागातील दुसऱ्या मजल्यावरील असलेले पोस्ट ऑफिसमधील सर्व कर्मचारी रोजच्या प्रमाणे ऑफिस बंद केले
दि. 22 रोजीच्या मध्यरात्री चोरटयांनी पोस्ट ऑफिसचा दरवाजा तोडुन आतमध्ये शिरकाव केला. ऑफिसमधील कपाटे फोडली, तिजोरीच्या ठिकाणी असलेली
भिंत फोडुन तिजोरी घेऊन दुसया मजल्यावरुन ढकलत खाली आणण्यात आली.तिजोरी जाड असल्याने चोरटे घेऊन जाऊ शकले नाहीत. तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला पण तिजोरी फोडता न आल्याने तशीच खाली सोडुन चोरटयांनी पळ काढला.
पोस्ट ऑफिस मधील अंदाजे तीस हजार रुपयांचे चोरटयांनी नुकसान केले असुन तिजोरीत पन्नास हजार रुपये रोख असल्याची माहिती पोस्ट मास्तर तानाजी शिंदे यांनी दिली.
तर पोलीसांनी तात्काळ चोरास अटक केल्याने पोलीसांच्या कार्याचे कौतूक केले जात आहे.
Comments
Post a Comment