वाढदिवसाचा खर्च टाळून केला गरूजूंना शिरा खिचडी वाटप

वाढदिवसाचा खर्च टाळून केला गरूजूंना शिरा खिचडी वाटप
मुखेडचे युवा कार्यकर्ते खाजा धुंदी यानी केले भटके व गरूजूंना शिरा खिचडीचे वाटप 
 मुखेड /प्रतिनिधी बल्खी आसद

 मुखेड येथिल युवा कार्यकर्ते खाजा धुदीं यानी आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचे खर्च टाळुन पोलिस कर्मचारी, नगर पालिका कर्मचारी , स्थालांतरीत भटके मजूर व गरजुंना शिरा आणि खिचडी वाटप केले. सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणुची परिस्थिती लक्षात घेऊन मुखेड येथील सामाजिक कार्यकर्ते खाजा धुंदी यांनी वाढदिवस साजरा करण्याचे टाळत मित्रमंडळा च्यावतीने गरजू लोकांना व कर्तव्यावर कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी, नगर पालिका कर्मचारी आणि पाल टाकून वास्तव्यास आसलेले भटके स्थालांतरीत मजूर, बाऱ्हाळी नाका, हिब्बट रोड, पोलीस चौकी, लोखंडे चौक, मधुर हॉटेल जवळील चेक पोस्ट वरील कर्तव्यावर असलेले कर्मचारी बांधव यांना शिरा आणि खिचड़ीचे वाटप करण्यात आले यावेळी प्रा व्यंकट बोईनवाड, सयद अब्दुल, गौस बागवान, पञकार बबलु मुल्ला, महेताब शेख, शादुल होनवडजकर,भवानी चौहाण, गजानन पलकोंडवार, प्रा अखील येवतीकर, इम्रान पठाण, आमेर शेख खाजा धुंदी यांनी पाल टाकून असलेल्या स्थालांतरीत भटके मजूर यांच्या लहान मुलांना गोड शिरा भरवून वाढ़दिवस साजरा केला.

Comments

Popular posts from this blog

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.