मानधन नको…पण पोलिसांसोबत काम करण्याची संधी द्या :- सुरक्षारक्षक शेख लतीफ

मानधन नको पण पोलिसांसोबत काम करण्याची संधी द्या :-सुरक्षारक्षक शेख लतीफ


प्रतिनिधि / बल्खी आसद

नांदेड़ :- नांदेड़ जिल्ह्यातील् लोहा येथील बस्थानकामध्ये सुरक्षा रक्षक असलेल्या शेख लतीफ़ यांनी मानधन न घेता पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मला परवानगी दयावी अशी मागणी लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
देशात व् राज्यात कोरोनाने थैमान घातले असुन पोलीस प्रशासन सध्या दिवसरात्र कर्तव्य बजावत आहे.लॉकडाऊन सुरु असल्याने पोलीस  यंत्रणा जीवाची परवा न करता कोरोनासारख्या महामारीत जनतेसाठी  24 तास जिवाचे रान करत आहे.
पोलीस बांधवाप्रमाणे मला ही काम करण्याची संधी दयावी अशी मागणी शेख लतीफ़ याने केली असुन बिना मोबदला स्वइच्छेने मानधन न घेता मी रस्त्यावर उतरुन पोलीस प्रशासनला  मदत करेन व देशसेवेसाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करेन असे शेख लतीफ़ याने पोलीसांना सहकार्य करण्याची भुमिका घेऊन आपली देशभक्ती दाखविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान