नांदेडकरांसाठी दिलासादायक: 'त्या' कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील 38 नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह

नांदेडकरांसाठी दिलासादायक: 'त्या' कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील 38 नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह


'त्या' कोरोना रुग्णाचे आठ नातेवाईकांना क्वारंटाईन, 3 हजार 79 घरांमध्ये 13 हजार 309 जणांची आरोग्य तपासणी.


नांदेड दि.२४ एप्रिल: शहरातील पीरबुर्‍हाणनगर येथील कोरोना बाधित रुग्णाचे आणखी आठ नातेवाईक यांना गुरुवारी क्वारंटाईन करण्यात आले आहेत.
 पीरबुर्हाणनगर येथील एका 64 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले. नांदेड जिल्ह्यातील हा पहिला रुग्ण ठरला.
बुधवारी त्यांच्या संपर्कातील जवळपास 30 ते 35 व्यक्ती आणि कुटुंबातील 15 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यांचे स्वॅबही तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
त्यानंतर गुरुवारी आणखी आठ कुटुंबियांना आरोग्य विभागाने क्वारंटाईन केले आहे. तपासणीसाठी त्यांचे ही स्वॅब घेतले जाणार आहे.

बुधवारी महापालिका आरोग्य विभागाने पीरबुर्‍हाणनगर व लगतचे सह्योगनगर, अशोकनगर, भाग्यनगर, वृंदावन कॉलनी, टिळकनगर, शास्त्रीनगर, उदयनगर, आंबेडकरनगर व
इंदिरानगर हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. या झोनमधील 3079 घरामधील 13309 व्यक्तींचे आरोग्य तपासणी करण्यात आली. थर्मल मशीनद्वारे
ताप आहे का सर्दी खोकला आदी लक्षणे आहेत का याची पाहणी करण्यात आली. तसेच या भागातील येणारे व जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. संपूर्ण परिसर सील करण्यात
 आला असून, पोलीस बंदोबस्तही या भागात लावण्यात आला आहे.  महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी  पीरबुर्‍हाणनगर येथे बुधवारी भेट दिली होती. गुरुवारी त्यांनी सर्वेक्षणाची माहिती घेतली.

पीरबुर्‍हाणनगर येथील रुग्णांच्या संपर्कातील व नातेवाईकांचे असे एकूण 38 स्वॅब बुधवारी आरोग्य विभागाने घेतले होते. त्यातील 38 जणाचे अहवाल निगेटिव्ह आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
 गुरुवारी दुपारी 33 अहवाल प्राप्त झाले रात्री 5 अहवाल मिळाले, त्याच वेळी रुग्णाचे नातेवाईक व संपर्कातील आणखी 17 व्यक्तीचे 23 एप्रिल रोजी घेतले आहेत. तसेच उंबरे येथील रुग्णालयातूनही 15 स्वॅब घेण्यात आले आहेत.
 पीरबुर्‍हाणनगर येथील रुग्णांच्या संपर्कातील एकूण 70 व्यक्तीचे स्वॅब दोन दिवसात घेण्यात आले आहेत.  38 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 37 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान