टँकरमध्ये बसून १८ विध्यार्थ्यांचा जालना ते नांदेड ठरत होता जीवघेणा प्रवास


टँकरमध्ये बसून १८ विध्यार्थ्यांचा जालना ते नांदेड ठरत होता जीवघेणा प्रवास: 
नांदेड़ : 25 -04-2020
टँकरमध्ये बसून १८ विध्यार्थ्यांचा जालना ते नांदेड प्रवास! लॉकडाऊन सुरू असताना देखील स्थलांतर थांबलेले नाही. प्रशासन आहे त्याच जागी थांबण्याचे आवाहन करत असताना लोक संचारबंदीचे वारंवार उल्लंघन करत आहेत. असाच एक प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे. 18 विद्यार्थ्यांनी टँकरमध्ये बसून जालना ते नांदेड असा जीवघेणा प्रवास केल्याचे उघडकीस आले. नांदेड दि.२५ एप्रिल- लॉकडाऊन सुरू असताना देखील स्थलांतर थांबलेले नाही. प्रशासन आहे त्याच जागी थांबण्याचे आवाहन करत असताना लोक संचारबंदीचे वारंवार उल्लंघन करत आहेत. असाच एक प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे. 18 विद्यार्थ्यांनी टँकरमध्ये बसून जालना ते नांदेड असा जीवघेणा प्रवास केल्याचे उघडकीस आले. तेलंगणाची टँकरमध्ये बसून १८ विध्यार्थ्यांचा जालना ते नांदेड प्रवास सुरू असल्याचे समजताच, नांदेड पोलिस गस्त घालत असताना ही घटना उघडकीस आली आहे. तेलंगाणा राज्यातील हे विद्यार्थी जालन्यात कृषी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होते. गाठीस असलेले पैसे संपल्याने त्यांची उपासमार होत होती. त्यामुळे हा निर्यण घेतल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.या 18 विद्यार्थ्यांत 16 मुले आणि 2 मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यासह टँकरच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेऊन सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. जालना ते नांदेड असा टँकरने प्रवास केल्यानंतर नांदेडहून तेलंगणात पायीच जाण्याचा त्यांचा विचार होता.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान