पुण्यात आज 90 नवीन रुग्णांची नोंद, कोरोना रुग्णांची संख्या 1070 वर, आज पुण्यात 4 जणांचा मृत्यू

पुण्यात आज 90 नवीन रुग्णांची नोंद, कोरोना रुग्णांची संख्या 1070 वर, आज पुण्यात 4 जणांचा मृत्यू.                                                                                                                         पुणे :  पुण्यातील कोरना बाधितांची संख्या वाढत असून पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची 1070 झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 73 वर पोहचली आहे. आज पुण्यात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्णाचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 90 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून 13 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. पुण्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 159 झाली आहे.

पुण्यात शनिवारी दिवसभरात 90 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. पुण्यात आज मृत्यू झालेल्यांमध्ये गंजपेठेतील 60 वर्षीय महिला, मार्केटयार्ड येथील 55 महिला, पर्वती येथील 72 वर्षीय पुरुष आणि येरवडा येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात 90 नवीन रुग्ण आढळून आले असून शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 1070 झाली आहे. आज महापालिकेच्या नायडू रुग्णालयात 79, ससून रुग्णालयात 9 आणि खासगी रुग्णालयात 2 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात 13 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्या आला आहे. त्यामध्ये नायडू हॉस्पीटलमधील 6, सिम्बॉयसिसमधील 2 आणि ससून, सह्याद्री हॉस्पिटल हडपसर, सह्याद्री हॉस्पीटल कर्वे रस्ता, रुबी आणि केईएम मधील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान