बेटमोगरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरली जत्रा

"सोशल डिस्टंसिंगला" खातेदारांनी दाखवली केराची टोपली 

 बेटमोगरा प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी 


देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून याला रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३ में पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे.अशा परिस्थितीत प्रतिबंधक उपाय म्हणून सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन शासनाने दिले होते.परंतु तालुक्यातील बेटमोगरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाहेर लांबलचक रांगा लावून खातेदारांनी शासनाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचे चित्र सद्या तरी बेटमोगरा येथील बँकेसमोर दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे की,लॉकडाऊन काळात प्रधानमंत्री गरिब कल्याण योजने अंतर्गत येथील बँकेत शेतकऱ्यांसाठी २००० हजार रुपये अनुदानासाठी व इतर विम्यासाठी खातेधारकांनी सकाळपासुनच गर्दी केली होती.तसेच या गर्दीचा रांगेत कुठेही अंतर नसुन एक दुसऱ्यांना अगदी जवळ उभे रहावे लागल्याने एखाद्या व्यक्तीस संसर्ग असल्यास विस्फोटक परिस्थीती बेटमोगरा परिसरात निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.त्यासाठी पोलिस प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देऊन येथील नागरिकांचा व बँकेतील कर्मचार्यांच्या आरोग्याशी होणारा मोठा अनर्थ टाळावे अशी मागणी बँक व्यवस्थापनाकडून व ग्रामस्थांकडून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान