55 वर्षापेक्षा वयस्क पोलिसांना घरीच थांबण्याचे निर्देश,पोलीस आयुक्त

55 वर्षापेक्षा वयस्क पोलिसांना घरीच थांबण्याचे निर्देश, मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णयउ

प्रतिनिधी :-  मुंबई पोलिस दलातील तिघा हवालदारांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागल्यानंतर पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अत्यंत तातडीची पावलं टाकली आहेत. 55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलिस खात्यातील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ज्यांचं वय 55 वर्षापेक्षा जास्त आहे, त्यांनी बंदोबस्तामध्ये सहभागी होऊ नये, अशा सूचना मुंबई पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलिस कर्मचारीही कोरोनाचे बळी ठरत आहेत.

गेले सलग तीन दिवस दररोज एका पोलिस कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व पोलिस कर्मचारी 50 वर्षे वयापेक्षा जास्त वयाचे होते. 55 वर्षापेक्षा अधिक वयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्तांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई पोलिस दलातर्फे उपाययोजना काय?
1) 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व कर्मचार्‍यांना घरीच राहण्याचे आदेश.
2) मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असणाऱ्या 52 वर्षावरील कर्मचारीही घरीच राहतील
3)  03/05/2020 पर्यंत पोलिस स्टेशनचे कर्मचारी 12 तास ड्युटी / 24 तास विश्रांती अशी शिफ्ट
4)  वैद्यकीय देखरेखीखाली 12 हजार जवानांसाठी एचसीक्यू टॅबलेट पुरवठा
5) प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी 20 हजार जवानांना मल्टीविटामिन आणि प्रथिनेपूरक आहार

गेल्या तीन दिवसात मुंबई पोलिस दलातील तीन पोलिसांचा बळी गेला होता. कुर्ला ट्रॅफिक विभागात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या हवालदाराचा काल (27 एप्रिल) कोरोनामुळे मृत्यू झाला होता. याआधी 26 एप्रिलला 52 वर्षीय हवालदाराचं निधन झालं, तर 25 एप्रिलला 57 वर्षीय हवालदारालाही कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. संबंधित कर्मचारी वाकोला पोलिस ठाण्यात कार्यरत होता, तर वरळीचा रहिवासी होता.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी मृत्यू झालेल्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा केली होती.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान